Poultry Farming Loan 2026 Detail In Marathi : नमस्कार माझ्या तरुण व शेतकरी बांधवांना तुम्हाला स्वतःचा पोल्ट्री फार्म म्हणजे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा आहे तर तुमच्यासाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत सध्या ग्रामीण भागामध्ये कुक्कुटपालनाचे व्यवसायाला चांगली मागणी आहे या व्यवसायातून अंडी चिकन विक्री करून मोठे उत्पन्न मिळवता येते.
परंतु अनेक तरुण शेतकरी बांधव आहेत ज्यांना हा व्यवसाय तर सुरू तर करायचा आहे परंतु पैसे नसल्यामुळे ते हे व्यवसाय सुरू करू शकत नाहीत. परंतु महाराष्ट्र शासनाकडून अनेक अशा योजना सुरू आहेत ज्या योजनेअंतर्गत 35 टक्के सबसिडी अंतर्गत लोन दिली जाते म्हणजे जर तुम्ही 20 लाख रुपयांची लोन घेतले तर तुम्हाला 6 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते.
तर आज आपण ह्या आर्टिकलच्या माध्यमातून पोल्ट्री फार्म म्हणजे कुक्कुटपालन व्यवसाय साठी कर्ज कशाप्रकारे घ्यायचं, योजना कोणती, अनुदान कशाप्रकारे मिळणार त्याची पात्रता काय. आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कशाप्रकारे ऑनलाईन भरायचा ही सर्व माहिती आपण स्टेप बाय स्टेप पुढे पाहणार आहोत त्यासाठी या आर्टिकल ला शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणती प्रश्न राहणार नाहीत.
Table of Contents
Overview – Poultry Farming Loan 2026 In CMEGP
| योजनेचे नाव | मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम |
| आर्टिकल चे नाव | Poultry Farming Loan 2026 In CMEGP |
| राज्य | महाराष्ट्र |
| व्यवसायाचे प्रकार | बॉयलर, लियर, देशी कोंबडी पालन करणे |
| अनुदान | 15 ते 35 टक्के पर्यंत |
| लाभार्थी | शेतकरी, बेरोजगार तरुण आणि उद्योजक |
| कर्ज देणारी संस्था | महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रकृत व ग्रामीण बँका |
| प्रकल्प खर्च | 50 लाखापर्यंत |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
| अधिकृत वेबसाईट | https://maha-cmegp.gov.in |
| हेल्पलाइन नंबर | 022 22023912 |
पोल्ट्री फार्म व्यवसायासाठी किती पर्यंत कर्ज मिळते
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत अशा प्रकारच्या व्यवसायासाठी प्रकल्प खर्चाची मर्यादा 50 लाखापर्यंत ठेवलेली आहे त्यामुळे या व्यवसायासाठी 50 लाखापर्यंत लोन साठी अर्ज करू शकता. परंतु बँक 50 लाख रुपये सरळ मंजूर होणार असे नाही त्यामध्ये स्वतःचे भांडवल किती आहे तसेच तुमची क्षमता आहे का व्यवसाय करायची व परतफेड करण्याची या सर्व बाबीला तपासून बँक तुम्हाला लोन देण्याची मर्यादा ठरवते.
पोल्ट्री फार्म व्यवसाय साठी किती टक्के अनुदान मिळते ?
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत 15 ते 35 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते त्याची माहिती खालील प्रमाणे आहे .
| लाभार्थ्यांची प्रवर्ग | शहरी भागासाठी | ग्रामीण भागासाठी |
| खुल्या प्रवर्गासाठी | 15% | 25% |
| विशेष प्रवर्गासाठी SC, ST, OBC, VJNT, महिला, दिव्यांग | 25% | 35% |
पोल्ट्री फार्म व्यवसायाचे प्रकार
- बॉयलर पोल्ट्री फार्म : या प्रकारच्या व्यवसायामध्ये बायलर कोंबड्याचे पालन केले जाते आणि विक्रीसाठी स्थानिक व्यापारी व चिकन किंवा इतर ठिकाणी पाठवले जाते.
- लेअर पोल्ट्री फार्म : या प्रकारात अंडी उत्पन्नासाठी कोंबड्यांचे पालन केले जाते यामध्ये अंडी विक्री करून उत्पन्न मिळवण्याचा मुख्य उद्दिष्ट असतो
- देशी कुक्कुटपालन : या प्रकारामध्ये गावरान देशी कोंबड्याचे पालन केले जाते त्यामध्ये अंडी आणि कोंबडी, मुर्गा विक्री करण्यात येते.
पोल्ट्री फार्म व्यवसायासाठी लोन घेण्याची पात्रता
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
- अर्जदार किमान वय 18 वर्षे पूर्ण असावे
- प्रकल्प अहवाल नवीन व्यवसायासाठी असावा
- यापूर्वी अशा प्रकारच्या योजनेअंतर्गत अनुदान घेतलेला नसावा
- अर्जदार हा सुशिक्षित असावा
- अर्जदाराकडे आवश्यक सर्व कागदपत्रे असावे
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी काही पात्रता नियमावली जाहीर करण्यात आले यामध्ये वेळोवेळी या मध्ये बदल होऊ शकतात.
पोल्ट्री फार्म व्यवसायासाठी लोन घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
- अधिवास प्रमाणपत्र
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र ( लागू असल्यास )
- व्यवसायाचा प्रकल्प अहवाल
- व्यवसायाची कागदपत्रे
- शेड बांधकाम व इतर साहित्याचे अंदाजपत्रक व कोटेशन
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर व ईमेल आयडी
पोल्ट्री फार्म व्यवसाय साठी ऑनलाइन अर्ज कसा सादर करावा ?
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे त्यामध्ये अर्जदारांना महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करावे लागेल त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.
- सर्वात पहिले महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला ( https://maha-cmegp.gov.in/ ) भेट द्यावी लागेल
- आता तुमच्यासमोर ह्या वेबसाईटची होम पेज ओपन होईल

- त्यामध्ये तुम्हाला Online Application for Individual Applicant या पर्यावर क्लिक करायचा आहे
- क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरायचे आहे.

- माहिती योग्य प्रकारे भरल्यानंतर आता तुम्हाला आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील

- सर्व कागदपत्रे हे पीडीएफ स्वरूपात असावे
- सर्व माहिती व कागदपत्रे योग्य प्रकारे सादर केल्यानंतर अर्ज हा Save करावा
अशाप्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने Poultry Farming Loan 2026 In CMEGP योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करतानी काहीअडचणी येत असतील तर तुम्ही जवळच्या डी आय सी ऑफिस म्हणजे जिल्हा उद्योग केंद्रामध्ये भेट देऊन पण अर्ज सादर करू शकता जातानी तुम्हाला आवश्यक सर्व कागदपत्रे ओरिजनल स्वरूपात घेऊन जावे लागते.
FAQ- Poultry Farming Loan 2026 In CMEGP
कुक्कुटपालन व्यवसायासाठी जास्तीत किती कर्ज मिळते ?
या व्यवसायासाठी 20 लाखापर्यंत लोन घ्यायचा असेल तर Online अर्ज सादर करू शकता परंतु यापेक्षा अधिक लोन घ्यायचा असेल तर आपण जिल्हा उद्योग केंद्र ची भेट देऊन अर्ज करावे.
पोल्ट्री फार्म व्यवसायासाठी लोन घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो का ?
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत पोल्ट्री फार्म व्यवसायासाठी लोन घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.
या योजनेअंतर्गत लोन घेण्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट अनिवार्य आहे का ?
हो मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत लोन घेण्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट अनिवार्य आहे
या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदान लगेच मिळते का
अनुदानाची रक्कम लगेच मिळत नाही योजनेच्या नियमानुसार लोन वितरण झाल्यानंतर बँकेला अनुदानासाठी क्लेम करावा लागतो त्यानंतर अनुदान दिले जाते.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अंतर्गत फक्त याच योजनेसाठी लोन व अनुदान मिळते का ?
नाही या योजनेअंतर्गत अनेक प्रकारच्या व्यवसायासाठी लोन व अनुदान दिले जाते.