Ladki Bahin Yojana e KYC Update 2026 News In Marathi : महाराष्ट्र सरकारची सर्वात लोकप्रिय योजना ज्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ज्या महिलांनी अद्याप आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही अशा अनेक महिला या योजनेच्या लाभापासून वंचित आहे
अशा महिलांसाठी पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आमदार मा. सुधीर भाऊ मुंगटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे तर आज आपण या बातमी ( Ladki Bahin Yojana e KYC Update 2026 ) संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
लाडक्या बहिणींसाठी पुन्हा ई-केवायसी सुरू होणार ?
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना महाराष्ट्र सरकारकडून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे परंतु या योजनेअंतर्गत अनेक महिलांनी अद्याप आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यामुळे अशा महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणे बंद झाले आहे.
अनेक महिलांना वेबसाईटचे सर्व असल्यामुळे तसेच इंटरनेट समस्येमुळे व त्याप्रमाणे आधारला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे आणि इतर तांत्रिक काळामुळे त्या महिला या योजनेची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकली नाही त्यामुळे केवळ तांत्रिक अडचणीमुळे या योजनेच्या पात्र महिलांना आर्थिक मदत बंद करू नये यासाठी पुन्हा एकदा एकेवायसी प्रक्रिया करण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
ई – केवायसी करण्यासाठी यापूर्वी किती मुदत दिली होती
महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील कोटीवधी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले होते त्यासाठी सरकारने 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत दिलेली होती त्यानंतर शासनाने 2 एप्रिल 2026 रोजीच्या परिपत्रकानुसार ही ई-केवायसी करण्याची तारीख ही 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवलेली होती
मात्र मुदतवाड देऊही अनेक पात्र महिलांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही आणि आता ई-केवायसी करण्यासाठी पुन्हा संधी मिळावी अशी मागणी लाडक्या बहिणीकडून केली जात आहे.
हे पण वाचा : पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू करा! ₹7 लाखांपर्यंत अनुदान मिळवा; पाहा संपूर्ण अर्ज प्रक्रिया 2026
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार मुख्यमंत्र्याकडे काय मागणी केली
- आमदार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत
- ई केवासी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महिलांना पुन्हा एकदा संधी देण्यात यावे
- ई केवासी ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदत वाढवून द्यावी
- तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सुलभ व्यवस्था निर्माण करावी
- संबंधित विभागाला आवश्यकसूचना देण्यात याव्यात
- ई केवासी न केल्यामुळे पात्र महिलांचे आर्थिक लाभ बंद करू नये

मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देश
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक दखल घेतली आहे तसेच सहकार विभागाच्या प्रधान सचिवांना या विषयावर आवश्यक ती कारवाई करण्यासाठी त्यांनी निर्देश दिले आहेत त्यामुळे शासनाच्या अधिकृत निर्णयाची आता प्रतिशा करणे आवश्यक आहे.
ज्या महिलांनी ई केवासी पूर्ण केली नाही त्यांनी पुढील भाबी लक्षात ठेवाव्यात
- आधार कार्ड जवळ ठेवावे
- आधार शी लिंक असलेला मोबाईल सुरू ठेवावा
- बँक खाते डीबीटी इनेबल आहे का नाही हे तपासून घ्यावे
- ई केवासी साठी शासनाकडून नवीन सूचना किंवा मुदत वाढ जाहीर होते का याकडे लक्ष ठेवावे
- फक्त अधिकृत लाडकी बहिणी योजनेच्या वेबसाईटवर ई केवायशी प्रक्रिया पूर्ण करावी
महत्वाची सूचना : महाराष्ट्र शासनाकडून ई केवासी साठी नवीन मुदत वाढ किंवा पुन्हा प्रक्रिया सुरू झाल्याची अधिकृत घोषणा ( Ladki Bahin Yojana e KYC Update 2026 ) होईपर्यंत लाडक्या बहिणी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये.