Dr Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2026 : नवीन विहीर बांधकामासाठी 4 लाखांपर्यंत अनुदान, पात्रता, कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

Dr Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2026 Detail In Marathi : महाराष्ट्र सरकारकडून वेळोवेळी राज्यातील शेतकरी बांधवांसाठी वेगळ्या प्रकारच्या योजना सुरू केले जातात अशातच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या मार्फत अनुसूचित जाती प्रवगातील शेतकरी बांधवांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकरी बांधवांना नवीन विहीर बांधकामासाठी 4 लाख रुपये अनुदान दिले जात आहे.

ज्या शेतकरी बांधवाकडे स्वतःच्या मालक्याकाची शेती आहे परंतु पाण्याची सुविधा नाही अशा शेतकरी बांधवांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे परंतु अनेक शेतकरी बांधव आहे ज्यांना या योजनेची माहिती नाही त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्ज कसा करायचा व कुठे करायचा यासंदर्भात कुठलीच माहिती नाही तर आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून या योजनेसाठी अर्ज कसा करायचा त्याची मंजुरी प्रक्रिया कशी आहे काय काय कागदपत्र लागतील सर्व माहिती आज आपण पाहणार आहोत.

Dr Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2026 – Overview

योजनेचे संपूर्ण नावडॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2026
विभागकृषी विभाग महाराष्ट्र शासन
लाभार्थीअनुसूचित जाती / नवबौद्ध प्रवर्गातील शेतकरी
योजनेचा लाभनवीन विहीर बांधकाम करने
अनुदान4 लाख रुपये
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
योजनेची अधिकृत वेबसाईटhttps://mahadbt.maharashtra.gov.in
Online Apply Link Click Here

नवीन विहीर बांधकामासाठी किती अनुदान दिले जाते

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवली जाणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत अनुसूचित जातीमधील पात्र शेतकरी बांधवांना नवीन विहीर बांधकामासाठी 4 लाख रुपये पर्यंत अनुदान दिले जात आहे या योजनेचा मुख्य उद्देश शेतकरी बांधवांना स्वतःच्या शेतीत सिंचनाची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून देणे.

ज्या शेतकरी बांधवांना आपल्या शेतामध्ये नवीन विहीर बांधकाम करायचे आहे त्या शेतकरी बांधवांना या योजनेअंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे अर्ज सादर केल्यानंतर संबंधित विभागाकडून अर्जाची पडताळणी केली जाणार त्यानंतर या योजनेच्या नियमानुसार अर्ज मंजूर केली जाणार सदर विहीर बांधकामासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत 4 लाख रुपये अनुदान दिले जाते.

हे पण वाचा : पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू करा! ₹7 लाखांपर्यंत अनुदान मिळवा; पाहा संपूर्ण अर्ज प्रक्रिया 2026

विहीर अनुदान योजनेसाठी कोण पात्र आहे

या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने काही पात्रता व अटी ठेवलेले आहेत त्याची माहिती खालील प्रमाणे आहे .

  • अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावा
  • अर्जदार शेतकरी हा अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असावा
  • अर्जदार शेतकरी बांधवाकडे SC जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराच्या नावाने शेती असणे आवश्यक आहे
  • नवीन विहीर बांधकामासाठी किमान 0.40 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे
  • अर्जदार शेतकरी बांधवाकडे ७ / १ २ आणि ८ अ उतारा असणे आवश्यक
  • अर्जदाराकडे आधार कार्ड व बँक पासबुक असणे आवश्यक
  • अर्जदार या अगोदर या योजनेअंतर्गत लाभ घेतलेला नसावा

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांकडे आवश्यक सर्व कागदपत्रे असणे अनिवार्य आहे त्याची माहिती खालील प्रमाणे.

  • आधार कार्ड
  • अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र
  • 7 बारा
  • 8 अ उतारा
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • बँक पासबुक
  • प्रस्ताव व विहिरीचा नकाशा
  • ग्रामसभेचा ठराव
  • सामायिक शेती असल्यास संमती पत्र
  • अपंगतत्व असल्यास संबंधित प्रमाणपत्र
  • आधारला मोबाईल नंबर लिंक असणे

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे लागेल त्याची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे आहे याचा उपयोग करून तुम्ही घरबसल्या ऑनलाईन अर्ज करू शकता.

  • सर्वात पहिले कृषी विभागाच्या ( https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/Agrilogin/Agrilogin ) अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल
  • आता तुमच्यासमोर महाडीबीटी पोर्टल ओपन होईल
Dr Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2026 Step 1
Dr Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2026 Step 1
  • त्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे जर फॉर्मर आयडी असेल व्यक्तिगत शेतकरी या पर्याय निवडायचा आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमची फार्मर आयडी इंटर करावी लागेल आणि ओटीपी पाठवा या पर्यायावर क्लिक करायचा आहे
  • तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर ओटीपी येणार ओटीपी टाकून वेरिफाय करून घ्या
  • तसेच जर तुमच्याकडे फॉर्मर आयडी नसेल तर तुम्हाला आधार आधारित लॉगिन या पर्यावर क्लिक करायचा आहे.
  • आणि खाली तुमचा आधार कार्ड नंबर इंटर करायचा आहे व ओटीपी पाठवा या पर्यायावर क्लिक करायचा आहे
  • त्यानंतर तुमच्या मोबाईल वर ओटीपी येणार ओटीपी व्हेरिफाय करून घ्या.
  • ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर तुमच्यासमोर प्रोफाइल पेज ओपन
  • सर्वप्रथम तुम्हाला प्रोफाइल प्रक्रिया पूर्ण करावी लागेल
  • त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या जात श्रेणी आणि अपंगत्व या पर्यावर क्लिक करायचा आहे
  • आता तुम्हाला तुमचे जात प्रवर्ग निवडून जात प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल
Dr Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2026 Step 2
Dr Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2026 Step 2
  • त्यानंतर तुम्हाला अपंगतत्व निवडून Save पर्यावर क्लिक करायचं आहे
  • तसेच तुम्हाला तुमच्या शेतीची माहिती व बँक पासबुक डिटेल पण भरावी लागेल
  • अशा प्रकारे तुमची प्रोफाइल प्रक्रिया पूर्ण होईल
  • प्रोफाइल प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर
  • आता तुम्हाला नवीन विहीर बांधकामासाठी अर्ज करण्यासाठी घटकासाठी अर्ज करा या पर्यावर क्लिक करायचं आहे
Dr Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2026 Step 1
Dr Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2026 Step 1
  • आता तुमच्या सोबत वेगवेगळ्या प्रकारचे योजना दिसतील त्यामध्ये तुम्हाला अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या पर्यायावर क्लिक करायचं आहे
  • आता तुमच्यासमोर अर्ज करण्याचा फॉर्म ओपन होईल
  • तुम्हाला तुमच्या शेतीची माहिती समोर दिसेल त्यामध्ये तुम्हाला बाब या पर्यायांमध्ये नवीन विहीर बांधकाम हे पर्याय निवडायचा आहे
Dr Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2026 Step 3
Dr Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2026 Step 3
  • पर्याय निवडल्यानंतर खाली तुम्हाला हो, नाही चे पर्याय दिसतील ते योग्य प्रकारे निवडून जतन करा या पर्यावर क्लिक करायचा आहे
  • आता तुम्हाला या अर्जाचे पेमेंट प्रक्रिया पूर्ण करावी लागेल
  • त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा घटकासाठी अर्ज करा या पर्यावर क्लिक करायचं आहे
  • आता तुम्हाला सर्वात शेवटच्या बाजूला अर्ज सादर करा हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचा आहे
  • आता तुमच्यासमोर पेमेंट प्रलंबित अर्ज दिसतील त्यामुळे तुम्हाला तुम्ही निवड केलेल्या योजनेचा पेमेंट प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी
  • पेमेंट प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचा अर्ज योग्य रित्या सादर झाला आहे.
  • अशा प्रकारे तुम्ही नवीन विहीर बांधकामासाठी अर्ज सादर करू शकता.

FAQ- Dr Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2026

या योजना अंतर्गत विहीर बांधकामाचे पैसे कधी जमा होतात

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत नवीन विहीर बांधकामाचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात दोन ते तीन टप्प्यांमध्ये जमा केली जाते .

अर्ज केल्यानंतर किती दिवसात नवीन विहीर मंजूर केली जाते

मिळालेल्या माहितीनुसार विहीर मंजूर होण्याची कालावधी कृषी विभागाकडून अद्याप निश्चित केलेली नाही

नवीन विहीर बांधकाम अनुदानासाठी अर्ज कोण मंजूर करतो

नवीन विहीर बांधकामाच्या अर्ज लॉटरी पद्धतीने कृषी विभागाच्या माध्यमातून मंजूर केली जातात

नवीन विहीर बांधकाम अनुदानासाठी अर्ज कुठे करू शकतो

तुम्ही जवळच्या सीएस सेंटरला किंवा आपल्या मोबाईल फोन मधून अर्ज करू शकता

1 thought on “Dr Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2026 : नवीन विहीर बांधकामासाठी 4 लाखांपर्यंत अनुदान, पात्रता, कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!”

Leave a Comment