Shetkari Mitra Bharti 2026 : शेतकरी मित्र 11,587 पदांची भरती 2026 | गावातील युवकांसाठी सुवर्णसंधी जाणून घ्या पात्रता आणि Online अर्ज प्रक्रिया

Shetkari Mitra Bharti 2026 Detail In Marathi : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी मित्र भरती 2026 संदर्भात महत्वाची माहिती जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 11,587 शेतकरी मित्राची भरती करण्याचे लक्ष ठेवण्यात आलेले आहे.

शेतकरी मित्र हा कृषी विभाग तसेच गाव पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे आत्म योजनेअंतर्गत या पदाची निवड करण्यात येणार आहे असून यासाठी शेतकरी मित्राला शासनाकडून अनुदान पण दिले जाणार आहे स तर आज आपण Shetkari Mitra Bharti 2026 मध्ये अर्ज कसा करू शकतो त्याची पात्रता काय यासंदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

Shetkari Mitra Bharti 2026 – Overview

योजनेचे नावआत्म योजना
विभागकृषी विभाग, महाराष्ट्र शासन
पदाचे नावशेतकरी मित्र
एकूण पदे11,587
शैक्षणिक पात्रताकिमान 12 वी पास
मानधन1500 रुपये प्रति महिना
कामाची कालावधी2 वर्ष
कामदिवसातून किमान 2 तास काम करणे आवश्यक
निवड प्रक्रियाशैक्षणिक पात्रता व गुणोत्तेनुसार
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
महिलांचा सहभाग30% आरक्षित
Online Apply Link Click Here
तालुकास्तरीय संपर्काचे ठिकाणतालुकास्तरीय कृषी अधिकारी कार्यालय / ग्राम कृषी विकास समिती
कृषी विभागाची अधिकृत वेबसाईटhttps://krishi.maharashtra.gov.in

शेतकरी मित्र भरती पात्रता

  • अर्जदार शेतकरी असणे आवश्यक
  • अर्जदाराचे किमान वय 25 ते 60 वर्षे असावे
  • अर्जदार संबंधित कृषी अधिकारी कार्यक्षेत्रातील गावातील रहिवासी असावा
  • अर्जदाराचे शैक्षणिक पात्रता किमान बारावी पास असणे आवश्यक
  • अर्जदार याना सोशल मीडियाचे कौशल्य असणे आवश्यक
  • अर्जदार ला दिवसातून किमान दोन तास कृषी विभागाचे काम करावे लागेल
  • अर्जदार शेतकरी बांधवाकडे आवश्यक सर्व कागदपत्रे असणे आवश्यक

शेतकरी मित्राचे मानधन

शेतकरी मित्राला कृषी विभागाच्या आत्म योजनेअंतर्गत 1500 प्रति महिना प्रमाणे मानधन दिले जाणार म्हणजे वर्षाला एकूण 18 हजार रुपये इतके मानधन दिले जाईल मानध हे तीन महिन्याचे एकत्रित करून वर्षातून चार टप्प्यात दिले जाणार आहे

शेतकरी मित्राचे कर्तव्य व काम

शेतकरी मित्र हे पद गावातील शेतकरी बांधवांना सहकार्य करण्यासाठी नेमण्यात येणार त्यामध्ये त्यांना कृषी विभागाच्या विविध योजना व उपक्रमाची प्रसिद्धी करणे तसेच शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करणे त्याची प्रमुख कामे खालील प्रमाणे आहे.

  • आत्म योजनेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनेचे प्रसार प्रसिद्धी करणे व शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करणे
  • नैसर्गिक शेती व आत्मयोजनांतर्गत शेती शाळेसाठी शेतकरी लाभार्थ्यांची निवड करणे
  • शेती शाळा राबवण्यासाठी सहकार्य करणे व त्याप्रमाणे शेती शाळेच्या सर्व वर्गांना उपस्थित ठेवणे
  • ग्रामपंचायत मधील ग्रामसभेमध्ये सहभाग घेऊन कृषी व कृषी सलग्न विभागाच्या योजनेची माहिती देणे
  • नैसर्गिक शेती योजनेची प्रसार प्रसिद्धी करणे
  • कृषी तंत्रज्ञान व माहितीचा शेतकऱ्यापर्यंत माहिती पुरवणे
  • तालुका कृषी अधिकारी यांनी बोलावलेल्या बैठकीत उपस्थित राहणे आवश्यक
  • कृषी विभागाच्या विविध योजना व डिजिटल मोहिमा व कार्यशाळाची प्रचार प्रसिद्धी करणे
  • गावातील आयोजित शेतकरी कार्यशाळेसाठी पूर्वतयारी करणे
  • गाव पातळीवर शेतकरी सुविधा केंद्र तयार करणे

शेतकरी मित्र भरती 2026 आवशयक कागतपत्रे

  • आधार कार्ड
  • फॉर्मर आयडी
  • शेतकरी महिला प्रमाणपत्र
  • बँक पासबुक
  • सातबारा
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • मोबाईल
  • फोटो

Shetkari Mitra Bharti 2026 : जिल्हानिहाय पदांचे यादी

Sr. No.District NameTarget
1Thane123
2Palghar198
3Raigad311
4Ratnagiri363
5Sindhudurg249
Thane Division Total1,244
6Nashik546
7Dhule210
8Nandurbar243
9Jalgaon495
Nashik Division Total1,494
10Ahilyanagar629
11Pune614
12Solapur536
Pune Division Total1,779
13Satara475
14Sangli362
15Kolhapur374
Kolhapur Division Total1,211
16Chhatrapati Sambhajinagar368
17Jalna334
18Beed423
Chhatrapati Sambhajinagar Division Total1,125
19Latur297
20Dharashiv287
21Nanded408
22Parbhani295
23Hingoli181
Latur Division Total1,468
24Buldhana408
25Akola250
26Washim206
27Amravati447
28Yavatmal461
Amravati Division Total1,772
29Wardha235
30Nagpur369
31Bhandara164
32Gondia173
33Chandrapur346
34Gadchiroli207
Nagpur Division Total1,494
Maharashtra State Total11,587

सूचना : सदर माहिती अधिकृत मार्गदर्शक सूचनांमधील प्रपत्र क्रमांक 4 मध्ये नमूद केलेल्या आकडेवारीवर आधारित आहे अधिक माहिती साठी जवळच्या तालुका कृषी कार्यलय येथे भेट द्यावे .

हे पण वाचा :  पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू करा! ₹7 लाखांपर्यंत अनुदान मिळवा; पाहा संपूर्ण अर्ज प्रक्रिया 2026

Shetkari Mitra Bharti 2026 Online Apply

शेतकरी मित्र पदासाठी इच्छुक असलेल्या अर्जदाराने कृषी विभागाचे मार्फत सुरू असलेल्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज सादर करायचा आहे त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.

  • अर्जदार यांना सर्वात पहिले कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट ( https://krishi.maharashtra.gov.in/FarmerFriend/Default.aspx) द्यावी लागेल
  • आता त्यांच्यासमोर कृषी विभागाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल
Shetkari Mitra Bharti 2026 Online Apply Step 1
Shetkari Mitra Bharti 2026 Online Apply Step 1
  • आता तुम्हाला Apply online या पर्यावर क्लिक करावे लागेल
  • आता तुमच्यासमोर ऑनलाइन फॉर्म ओपन होईल
  • त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर फॉर्मर आयडी टाकावी लागेल
  • फॉर्मर आयडी नसेल तर सातबारा किंवा शेतकरी महिला प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल.
Shetkari Mitra Bharti 2026 Step 2
Shetkari Mitra Bharti 2026 Step 2
  • त्यानंतर तुम्हाला आधार नंबर एंटर करायचा आहे व आधार ओटीपी पाठवून व्हेरिफाय करून घ्यायचा आहे
  • व्हेरिफाय झाल्यानंतर आपण राहत असलेला पत्ता व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा आहे
Shetkari Mitra Bharti 2026 Step 3
Shetkari Mitra Bharti 2026 Step 3
  • आता तुम्हाला शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावे लागतील
  • सर्व माहिती व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज एकदा तपासून घेऊन  Submit या पर्यावर क्लिक करावा

अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने शेतकरी मित्रा साठी अर्ज सादर करू शकता तसेच सध्या कृषी विभागाची वेबसाईट तांत्रिक कारणामुळे चालू नाही आहे त्यामुळे आपण जवळच्या तालुका कृषी कार्यालय येथे भेट द्यावे आणि ऑफलाईन अर्ज सादर करता येते का याची खात्री करून घ्यावे .

शेतकरी मित्र पदाची निवड प्रक्रिया

आत्मा योजनेअंतर्गत निवड केली जाणाऱ्या शेतकरी मित्र पदाची निवड प्रक्रिया कृषी अधिकाऱ्यांच्या मुख्यालयांच्या ग्राम कृषी विकास समिती मार्फत केली जाणार आहे सदर इच्छुक उमेदवार यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागेल ज्या उमेदवाराचे सर्वोच्च शिक्षण असल्यास त्यांची निवड करण्यात येणार तसेच समान शैक्षणिक पात्रता असेल तर त्यांना त्यांना काही गुणाचा पेपर द्यावे लागेल.

शेतकरी मित्र पदाची कालावधी व वार्षिक मूल्यांकन

आत्मा योजनेअंतर्गत शेतकरी मित्र पद हे दोन वर्षाकरिता निवडण्यात येणार आहे शेतकरी मित्राला पहिल्या एका वर्षाची कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याचे वार्षिक मूल्यांकन करण्यात येईल त्यामध्ये 75 पेक्षा अधिक गुण मिळालेल्या शेतकरी मित्रांना पुढील वर्षाकरिता निवड करण्यात येईल अशी तरतूद करण्यात आली आहे.

Shetkari Mitra Bharti 2026 Official Documents & Links

शेतकरी मित्र भरती मार्गदर्शक सूचना 2026-27Click Here
Shetkari Mitra Online Application Link Click Here

महत्वाची सूचना

कृषी विभागाच्या आत्मा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या शेतकरी मित्र भरती प्रक्रिया संदर्भात अधिकृत शेतकरी मित्र मार्गदर्शक सूचना 26-27 या आधारित आहे अर्जदार बांधवांनी मार्गदर्शनाचे सूचनेचे वाचन करून तसेच तालुका स्तरीय कृषी अधिकारी कार्यालय येथे भेट देऊन या संदर्भात योग्य मार्गदर्शन घ्यावे आणि त्यानंतरच ऑनलाईन अर्ज सादर करावे.

FAQ – Shetkari Mitra Bharti 2026

शेतकरी मित्रासाठी अर्ज कुठे करावा ?

अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने किंवा संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या मुख्यालयांच्या ग्रामविकास समितीचे मार्फत अर्ज सादर करावा

शेतकरी मित्र हे पद कायमस्वरूपी आहे का ?

शेतकरी मित्र पद कायमस्वरूपी नाही याची कालावधी फक्त दोन वर्षासाठी आहे

शेतकरी मित्र पदासाठी महिलासाठी किती जागा आरक्षित आहे ?

तालुकास्तरीय निवड केली जाणाऱ्या जागेपैकी 30 टक्के महिला जागा हे आरक्षण असतील.

शेतकरी मित्र पदासाठी वयोमर्यादा किती ?

अर्जदाराची किमान वय 25 ते 60 वर्षे आत असावा

शेतकरी मित्राला किती मानधन दिले जाते

शेतकरी मित्राला पंधराशे रुपये प्रति महिना मानधन दिले जाणार आहे.

1 thought on “Shetkari Mitra Bharti 2026 : शेतकरी मित्र 11,587 पदांची भरती 2026 | गावातील युवकांसाठी सुवर्णसंधी जाणून घ्या पात्रता आणि Online अर्ज प्रक्रिया”

Leave a Comment