Maha ID Card Online Apply 2026 Detail In Marathi : महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी विविध शासनाच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज सादर करावा लागत होता त्यासाठी वेगळी वेगळी युजर आयडी पासवर्ड तयार करावे लागत होत्या या सर्व बाबींना लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना, शेतकरी बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच वेबसाईटच्या माध्यमातून मिळावा या उद्देशाने सरकारने महाडीबीटी पोर्टल 2.0 लॉन्च केली आहे.
या पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांना शासनाच्या अनेक योजनेचा व सेवेचा लाभ घेता येणार आहे आता शासनाच्या वेगवेगळ्या वेबसाईटवर जाऊन यूजर आयडी पासवर्ड तयार करून अर्ज सादर करावा लागणार नाही यासाठी फक्त लाभार्थ्यांना महाडी कार्ड काढावे लागेल, हे काढल्यानंतरच शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेता येणार आहे तर आज आपण महाडी कार्ड ( (Maha ID) कशाप्रकारे काढायचे, त्यासाठी लागणारी कागदपत्रे व संबंधित संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप आपण पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
Maha ID Card Online Apply 2026 – Overview
| पोर्टल चे नाव | महा सारथी पोर्टल -MahaSarathi (Maha ID) |
| राज्य | महाराष्ट्र |
| कार्डाचे नाव | महा आयडी कार्ड – Maha ID |
| लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील नागरिक व विद्यार्थी |
| उद्दिष्ट | डिजिटल नागरिक ओळख |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
| अर्ज करण्याची पद्धत | महा सारथी पोर्टल च्या माध्यमातून |
| अधिकृत वेबसाईट | https://mahasarathi.maharashtra.gov.in/ |
महा आयडी कार्ड म्हणजे काय ?
महाराष्ट्र सरकारकडून आता शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना महा आयडी काढणे अत्यंत आवश्यक झालेले आहे शासनाच्या महासारथी वेबसाईटच्या माध्यमातून नागरिकांना हे महा आयडी कार्ड काढायचा आहे त्यांना एक विशिष्ट डिजिटल ओळख क्रमांक दिला जाणार आहे.
या प्रणालीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनाच्या योजनेसाठी एकाच ठिकाणी अर्ज करण्यासाची सुविधा उपलब्ध करून दिले जाणार आहे महाराष्ट्राच्या अधिकृत माहितीनुसार जवळपास 93 पेक्षा अधिक योजना आणि 1077 पेक्षा अधिक सेवा याच्या माध्यमातून मिळणार आहेत त्यामध्ये महाडीबीटी 2.0 पोर्टल मधील योजना व सेवेचा लाभ घेण्यासाठी पण या महा आयडी कार्ड आवश्यक आहे.
महा आयडी कार्ड चे फायदे
महा आयडी कार्ड काढल्यानंतर राज्यातील नागरिकांना याचा फायदा काय होतो याची माहिती खालील प्रमाणे आहे.
- विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी एक विशिष्ट क्रमांक मिळतो
- सरकारी योजनेचा अर्ज करण्यासाठी व सरकारी सेवेचा लाभ घेण्यासाठी महा आयडी कार्ड उपयोगी ठरते
- वेगवेगळ्या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी वेगवेगळे युजर आयडी पासवर्ड तयार करण्याची आवश्यकता पडणार नाही
- महा आयडी कार्ड च्या माध्यमातून अनेक योजनेचा लाभ घेणे अगदी सोपे होणार.
हे पण वाचा : मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये! कोणाला मिळणार लाभ? जाणून घ्या संपूर्ण माहिती व नवीन अर्ज Online प्रक्रिया
महा आयडी कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
महा आयडी कार्ड काढण्यासाठी खालील प्रमाणे कागदपत्राची आवश्यकता लागणार
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- व्यक्तिगत माहिती
- आधार ला मोबाईल लिंक असे आवश्यक
महा आयडी कार्ड आणि महाडीबीटी 2.0 चा काय संबंध ?
महाडीबीटी 2.0 हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत पोर्टल आहे या पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी ज्या योजना सरकार राबवते त्या योजनेसाठी अर्ज करणे व इतर लाभार्थ्यांना विविध योजनेसाठी अर्ज करण्यासाठी हे पोर्टल सरकारने सुरू केलेली आहे.
त्यामुळे महाडीबीटी 2.0 पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करण्यासाठी नागरिकाकडे महा आयडी कार्ड असणे अनिवार्य आहे तर महाआडी कार्ड नसेल तर या महाडीबीटी पोर्टल मधून ज्या विविध योजना आहे त्या योजनेचा अर्ज त्या नागरिकांना करता येणार नाही त्यामुळे महा आयडी कार्ड शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य आहे.
Maha ID Card Online Apply 2026
महा आयडी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करावे लागेल तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईल फोन पण महा आयडी कार्ड तयार करू शकता त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.
- सर्वात पहिले महायडी कार्ड काढण्यासाठी महा सारथी या वेबसाईटवर ( https://mahasarathi.maharashtra.gov.in भेट द्यावी लागेल.
- आता तुमच्यासमोर नवीन नोंदणी करण्यासाठी आधार नंबर टाकण्याचा फॉर्म ओपन होईल

- किंवा तुम्हाला नागरिक लॉगिन या पर्यायावर क्लिक करून
क्लिक केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा या पर्यावर क्लिक करायचं आहे

- आता तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून अटी आणि शर्ती वाचून घेऊन ओटीपी पाठवा या पर्यावर क्लिक करायचा आहे
- आधार ला लिंक असलेल्या मोबाईलवर ओटीपी येणार ओटीपी टाकून ओटीपी सत्यापित करा या पर्यावर क्लिक करा

- आता तुमच्यासमोर सहमती पेज ओपन होईल त्यामध्ये दिलेली माहिती वाचून घ्यावी आणि स्वीगकृती घ्या आणि पुढे जा या पर्यावर क्लिक करावे.

- आता तुमच्यासमोर तुमचे तपशील सत्यापित करा हा पेज ओपन होईल
- तुमचा मोबाईल नंबर टाकून जतन करा आणि पुढे जा या पर्यावर क्लिक करा
आता तुमच्या मोबाईलवर ओटीपी येणार तो ओटीपी टाकून. व्हेरिफाय करून घ्या. - आता तुमच्यासमोर नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली! असा पेज दिसेल

- अशी माहिती समोर आल्यानंतर तुमचा महा आयडी कार्ड साठी अर्ज योग्य रित्या सादर झाला आहे
- पुढील 24 तासांमध्ये तुमचे महा आयडी कार्ड तयार होऊन ते तुम्ही डाऊनलोड करू शकता.
Maha ID Card Download प्रक्रिया
महा आयडी कार्ड साठी अर्ज केल्यानंतर जर 24 तास पूर्ण झालेले आहे तर आता आपण महाडी कार्ड डाऊनलोड करू शकतो त्याची प्रक्रिया खालील प्रमाणे.
- सर्वात पहिले तुम्हाला पुन्हा एकदा महासारखी या वेबसाईटला ( https://mahasarathi.maharashtra.gov.in) भेट द्यावी लागेल.
- आता तुम्हाला नागरिक लॉगिन या पर्यायावर क्लिक करायचं आहे
- तुमच्यासमोर लॉगिन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला आधार पर्याय निवडून तुमचा आधार नंबर टाकून लॉगिन या पर्यावर क्लिक करायचा आहे.

- आता तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून व्हेरिफाय करून घ्या
- लॉगिन झाल्यानंतर तुमच्या समोर एक Fetch Your Details Securely पेज ओपन होईल

- त्यामध्ये तुम्हाला सर्वात खाली Skip for Now या पर्यावर क्लिक करायचं आहे
- आता तुमच्यासमोर तुमचा लॉगिन झालेला पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रोफाईल फोटो वर क्लिक केल्यानंतर त्याखाली प्रोफाइल पर्यावर क्लिक करायचा आहे.

- आता तुमच्या समोर तुमचे प्रोफाईल ओपन होईल
- तुम्हाला महा आयडी कार्ड डाउनलोड करण्यासाठी महा सारथी कार्ड पहा या पर्यावर क्लिक करायचा आहे

- आता तुमच्या समोर महा आयडी कार्ड दिसेल त्याच्याखाली महा सारथी डाऊनलोड करा ह्या पर्यावर क्लिक करायचा आहे
- क्लिक केल्यानंतर महायडी कार्ड डाउनलोड होऊन जाईल त्याला प्रिंट काढून कोटिंग करून घ्यायचे आहे.
अशाप्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुमचे महा आयडी कार्ड डाऊनलोड करू शकता त्याचप्रमाणे महा आयडी कार्ड ला ओपन करण्यासाठी काही पासवर्ड तुम्हाला टाकावे लागेल त्यामध्ये तुम्हाला ( First 4 letters of your name (CAPITALS) + Year of Birth (YYYY) त्यामध्ये तुम्हाला आधार वरील तुमच्या नावाचे चार अंक आणि तुमच्या जन्म तारखेचे वर्ष टाकायचा आहे.
Maha ID Card Online Apply 2026 Official Documents & Links
| महा आयडी कार्ड मार्गदर्शन Pdf Link | Click Here |
| Maha ID Card Online Apply Link | Click Here |
FAQ- Maha ID Card Online Apply 2026
महा आयडी कार्ड म्हणजे काय ?
महाराष्ट्र शासनाच्या महा सारथी डिजिटल प्लॅटफॉर्मवर नागरिकाला दिला जाणारा एक विशिष्ट डिजिटल ओळख क्रमांक आहे ज्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनेचा व सेवेचा अर्ज करण्यासाठी उपयोग केला जातो.
महा आयडी कार्ड मोबाईल वरून काढता येते का ?
हो महाडी कार्ड घरबसल्या स्वतःच्या मोबाईलला पण काढता येते.
महा आयडी कार्ड काढण्यासाठी आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे का ?
हो महा आयडी कार्ड काढण्यासाठी आधारला मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे
आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक कुठे करावा ?
आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी जवळच्या आधार केंद्र वर जावे लागेल.
महा आयडी कार्ड काढण्यासाठी किती खर्च लागतो
महा आयडी कार्ड काढण्यासाठी कुठल्या प्रकारचे शुल्क सरकारकडून आकारले जात नाही.

1 thought on “Maha ID Card Online Apply 2026 : महा आयडी कार्ड काढा फक्त १ मिनिटात, पाहा संपूर्ण अर्ज प्रक्रिया! योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य!”