Lek Ladki Yojana 2026 : मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये! कोणाला मिळणार लाभ? जाणून घ्या संपूर्ण माहिती व नवीन अर्ज Online प्रक्रिया

Lek Ladki Yojana 2026 Detail In Marathi : महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील मुलीचा कमी जन्मदर लक्षात घेऊन मुलीच्या शिक्षणासाठी तसेच राज्यामध्ये मुलीचा जन्मदर वाढावा यासाठी 1 ऑगस्ट 2017 पासून माजी कन्या भाग्यश्री ही योजना सुरू केली होती सदर या योजनेत मिळणारा अपुरा प्रतिसाद पाहता यामध्ये सरकारने सुधार करून 1 एप्रिल 2023 पासून लेक लाडकी योजना सुरू केली.

या योजनेअंतर्गत राज्यातील पिवळ्या व केशरी रंगाच्या राशन कार्ड धारक कुटुंबात जन्मलेल्या मुलीच्या पालन पोषणासाठी व त्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचे ठरवले आहे त्याचप्रमाणे लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर थेट 7500 हजार रुपये व एकूण 1 लाख 1 हजार रुपये देण्याची तरतूद पण या योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे.

ही योजना महाराष्ट्र राज्यातील 1 एप्रिल 2023 नंतर जन्म घेतल्या मुलीसाठी आहे मुलीच्या जन्मानंतर पालकांना मुलीच्या वतीने अर्ज करावा लागेल यासाठी सरकारने सुरुवातीला ऑफलाइन पद्धतीने अंगणवाडी केंद्रांमध्ये जाऊन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू केली होती या योजनेअंतर्गत आता महाराष्ट्र शासनाकडून या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने पण सादर करता येत आहे यासाठी सरकारने ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे तर आज आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर कसा करायचा यासाठी सरकारने कोणती वेबसाईट सुरू केली आहे हि सर्व माहिती आपण व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप पुढे पाहणार आहोत.

Lek Ladki Yojana 2026 – Overview

योजनेचे संपूर्ण नावलेक लाडकी योजना
योजनेची सुरुवात1 एप्रिल 2023
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील मुली
वयोमर्यादा1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुली
अर्ज करण्याची सुरुवात1 एप्रिल 2024
योजनेचे उद्दिष्टमुलीचा जन्मदर वाढवणे आणि त्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य करणे
आर्थिक मदत1 लाख 1 हजार रुपये
अर्ज प्रक्रियाऑनलाईन / ऑफलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://mahadbt2.maharashtra.gov.in/
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंकClick Here
हेल्पलाइन नंबर०२२-४९१५०८००

About Lek Ladki Yojana 2026

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली Lek Ladki Yojana 2026 मुलीचा जन्मदर वाढवणे त्याचप्रमाणे मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे त्याचप्रमाणे बालविवाह रोखणे व तसेच महिला सक्षमीकरण व सामाजिक समानता सुनिश्चित करणे या उद्देशाने लेक लाडकी योजना महाराष्ट्र सरकारकडून 1 एप्रिल 2023 पासून सुरू केलेली आहे

या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 1 एप्रिल 2023 किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुली या योजनेसाठी पात्र असतील त्यांना जन्मापासून ते 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत सरकारकडून एकूण 1 लाख 1 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे ही योजना गरीब कुटुंबातील मुलीच्या भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी योजना आहे या योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्याने लाभ दिला जातो सदर ही रक्कम डीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते.

हे पण वाचा :  महा आयडी कार्ड काढा फक्त १ मिनिटात, पाहा संपूर्ण अर्ज प्रक्रिया! योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य!

लेक लाडकी योजना अंतर्गत मिळणार लाभ

  • मुलगी जन्मल्यानंतर – 5000 रुपये
  • मुलगी इयत्ता 6 वी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर – 7000 रुपये
  • मुलगी येता 11 मध्ये प्रवेश घेतल्यानंतर- 8000 रुपये
  • मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर- 75000 रुपये
  • एकूण लाभ – 1 लाख 1 हजार रुपये

Lek Ladki Yojana 2026 ची पात्रता

लेक लाडकी योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकांना सरकारने ठेवले योजनेच्या निकषाला पूर्ण करावे लागेल जर अर्जदार खालील पात्रता अटी पूर्ण करत असेल तरच या योजनेअंतर्गत त्यांना लाभ मिळणार त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा
  • योजनेसाठी 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेली मुलगी पात्र असेल
  • केसरी आणि पिवळ्या रंगाचे राशन कार्ड धारक कुटुंब या योजनेसाठी पात्र असतील
  • एका कुटुंबातील दोन मुलीला या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल
  • कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करावे लागेल
  • लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख पेक्षा अधिक नसावे
  • लाभार्थ्याजवळ राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक असणे आवश्यक

Led Ladki Yojana 2026 साठी आवश्यक कागदपत्रे

लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकांना आवश्यक कागदपत्रे तयार करावी लागते त्याची माहिती आम्ही तुम्हाला खाली दिलेली आहे.

  • अधिवास प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • पालकांचे आधार कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • मुलीचा जन्म दाखला
  • केसरी किंवा पिवळ्या रंगाचे राशन कार्ड
  • बँक पासबुक
  • स्वघोषणा प्रमाणपत्र
  • जर मुलगी शिक्षण घेत असेल तर चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र
  • अंतिम लाभासाठी मुलीचे मतदान कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार लिंक मोबाईल नंबर

Lek Ladki Yojana 2026 ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

महाराष्ट्र सरकारकडून लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकांना ऑफलाइन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्याची माहिती खालील प्रकारे आहे.

  • अर्जदार पालकांना वरील दिलेले सर्व कागदपत्रे तयार करावे लागतील
  • त्यानंतर त्यांना अंगणवाडी सेविका कडून या योजनेचा फॉर्म घ्यायचा आहे
  • फॉर्म व्यवस्थितपणे भरून आवश्यक सर्व कागदपत्र जोडायचे आहे
  • त्यानंतर अंगणवाडी सेविकेजवळ हा अर्ज कागदपत्रासह सादर करायचा आहे
  • त्यांच्याकडून तुम्हाला अर्जाची पावती घ्यायची आहे.

अशा प्रकारे तुम्ही लेक लाडकी योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकता.

लेक लाडकी योजनेची उद्दिष्ट

महाराष्ट्र सरकारकडून लेक लाडकी योजना सुरू करण्यामागील चा मुख्य उद्देश मुलीचा जन्मदर वाढवणे त्याचप्रमाणे मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करून प्रोत्साहन करणे व तसेच मुलीचा मृत्यू दर कमी करून खाली विवाहावर प्रतिबंध लावणे त्याचप्रमाणे मुलीच्या वडिलाला मुलीचे पालन पोषण व शिक्षणासाठी आर्थिक मदत देऊन मुलीच्या वडीलाचे आर्थिक बोजे कमी करणे.

हे पण वाचा : शेतकरी मित्र 11,587 पदांची भरती 2026 | गावातील युवकांसाठी सुवर्णसंधी जाणून घ्या पात्रता आणि Online अर्ज प्रक्रिया

Lek Ladki Yojana 2026 Online Apply

महाराष्ट्र सरकारकडून लेक लाडकी योजनेची आता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे यासाठी सरकारने महाडीबीटी 2.0 ही वेबसाईट लॉन्च केली आहे यामध्ये विविध प्रकारच्या शासकीय योजनेसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे याच वेबसाईटच्या माध्यमातून आता लेक लाडकी योजनेसाठी पण मुलीचे वडील अर्ज करू शकतात त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.

  • सर्वात पहिले अर्जदार वडिलांना महाडीबीटी पोर्टलला भेट ( https://mahadbt2.maharashtra.gov.in ) द्यावी लागेल
  • आता तुम्हाला अगोदर महा आयडी तयार करावे लागेल
  • त्यासाठी नोंदणी करा या पर्यावर क्लिक करायचा आहे
  • आता तुम्हाला तुमची आधार नंबर टाकून ओटीपी पाठवा या पर्यावर क्लिक करून ओटीपी व्हेरिफाय करून घ्यायचा आहे
Lek Ladki Yojana 2026 Step 1
Lek Ladki Yojana 2026 Step 1
  • त्यानंतर मोबाईल नंबर व्हेरिफाय करून महा आयडी साठी अर्ज सादर करून घ्यावा
  • महाएटी २४ तासाच्या तयार होते तयार झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा याच वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • लॉगिन पेज असेल त्यावर क्लिक केल्यानंतर नागरिक लॉगिन हे पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून घ्यावा
  • आता तुम्हाला तुमचा आधार नंबर किंवा महा आयडी टाकून लॉगिन या पर्यावर क्लिक करायचा आहे
  • लॉगिन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता तुमच्यासमोर विविध योजना दिसतील
  • त्यामध्ये तुम्हाला लेक लाडकी योजना सर्च करायचे आहे
Lek Ladki Yojana 2026 Step 2
Lek Ladki Yojana 2026 Step 2
  • आता तुमच्यासमोर योजनेचा पर्याय दिसेल त्यामुळे तुम्हाला अर्ज करा या पर्यावर क्लिक करायचा आहे
  • आता तुमचा लेक लाडकी योजनेचा अर्ज ओपन होईल
Lek Ladki Yojana 2026 Step 3
Lek Ladki Yojana 2026 Step 3
  • त्यामध्ये तुम्हाला मागितलेली आवश्यक सर्व माहिती व कागदपत्रे अपलोड करून घ्यायचे आहे
  • आवश्यक सर्व माहिती व्यवस्थित त्या भरल्यानंतर कागतपत्रे अपलोड करून अर्ज दाखल करा या पर्यावर क्लिक करायचा आहे
Lek Ladki Yojana 2026 Step 4
Lek Ladki Yojana 2026 Step 4
  • क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज यशस्वीरित्या सादर होईल
  • तुम्ही वरील दिलेल्या माझा अर्ज पर्यावर क्लिक करून तुमच्या अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासू शकता
  • अधिक माहितीसाठी जवळच्या तालुकास्तरीय महिला व बालकल्या विभाग किंवा अंगणवाडी केंद्रशी भेट घेऊ शकता.

Lek Ladki Yojana 2026 Official Documents & Links

लेक लाडकी योजनेचा शासन निर्णय क्रमांक 1Click Here
लेक लडकी योजनेचा शासन निर्णय क्रमांक 2Click Here
लेक लाडकी योजनेचा ऑफलाइन फॉर्म pdfClick Here
लेक लाडकी योजनेची ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईटClick Here

FAQ- Lek Ladki Yojana 2026

लेक लाडकी योजनेचा अर्ज कुठे सादर करावा

लेक लाडकी योजनेचा अर्ज महाडीबीटी पोर्टल मार्फत सादर करता येते त्याचप्रमाणे जवळच्या अंगणवाडी सेविकेमार्फत पण सादर करता येतो.

लेक लाडकी योजनेची अर्ज करण्याची ऑनलाईन वेबसाईट

https://mahadbt2.maharashtra.gov.in/

लेक लाडकी योजनेसाठी कोणत्या मुली पात्र

1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुली

लेक लाडकी योजनेअंतर्गत किती लाभ मिळतो

लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलीला एकूण 1 लाख 1 हजार रुपये दिले जाते

लेक लाडकी योजनेच्या अधिक माहितीसाठी कुठे भेट द्यावी

लेक लाडकी योजनेच्या अधिक माहितीसाठी जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा तालुकास्तरीय महिला व बालविकास विभागाशी संपर्क करू शकता

2 thoughts on “Lek Ladki Yojana 2026 : मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये! कोणाला मिळणार लाभ? जाणून घ्या संपूर्ण माहिती व नवीन अर्ज Online प्रक्रिया”

Leave a Comment