Machi Palan Anudan Yojana 2026 Detail In Marathi : महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना जर आपल्या शेतीमध्ये मच्छी पालन व्यवसाय करायचा आहे अशा शेतकरी बांधवांसाठी खूप मोठी संधी सरकार देत आहे महाराष्ट्र राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागामार्फत मच्छी पालन व्यवसाय करण्यासाठी नवीन मत्स्यसंवर्धन तलाव बांधकाम निविष्ठा अनुदान योजने अंतर्गत सरकार थेट 9 लाख रुपये पर्यंत अनुदान देत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा देखील सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे.
तर आज आपण मच्छी पालन व्यवसायासाठी अनुदान कशाप्रकारे घेता येईल, अर्ज कशा प्रकारे करायचा व कागदपत्रे काय काय लागतील त्याचप्रमाणे कोणकोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत संपूर्ण माहिती व प्रक्रिया स्टेप बाय स्टेप आपण पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
Machi Palan Anudan Yojana 2026 – Overview
| योजनेचे नाव | मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना |
| अनुदान योजनेचे नाव | नवीन मत्स्यसंवर्धन तलाव बांधकाम निविष्ठा अनुदान योजना |
| राज्य | महाराष्ट्र |
| विभाग | मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र शासन |
| प्रकल्पाची किंमत | 12 लाख रुपये प्रति हेक्टर |
| अनुदान | 50 ते 75 टक्के पर्यंत |
| लाभ | नवीन मत्स्यसंवर्धन तलाव उभारणी करणे |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
| योजनेची लाभार्थी | शेतकरी |
| अधिकृत वेबसाईट | https://fisheries.maharashtra.gov.in/ |
| अर्ज करण्याची लिंक | Click Here |
| हेल्पलाइन नंबर | ०२२-३५२१०५६१ |
About Machi Palan Anudan Yojana 2026
मच्छी पालन तलाव बांधकाम अनुदान योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना मच्छी पालन करण्यासाठी व शेतकरी बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून 9 लाख रुपयाचे अनुदान दिले जाणार आहेत महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राबवली जाणारी ही योजना आहे.
ग्रामीण भागातील इच्छुक शेतकऱ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा व त्यासाठी त्यांना तलाव बांधकाम करण्यासाठी लागणारा खर्च त्याचप्रमाणे वाचे संवर्धनासाठी लागणाऱ्या निष्ठाचा खर्च लक्षात घेऊन सरकारकडून प्रकल्पाची किंमत 1 हेक्टरी प्रमाणे 12 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत किती अनुदान दिले जाते
महाराष्ट्र सरकारकडून या योजनेअंतर्गत प्रति हेक्टर प्रकल्प खर्च 12 लाख रुपये निश्चित करण्यात आले आहे त्यामध्ये तलाव बांधकाम करण्यासाठी 8 लाख रुपये आणि निविष्ठांसाठी 4 लाख रुपये अशी तरतूद करण्यात आलेली आहे त्यामध्ये प्रवर्गानुसार शेतकरी लाभार्थ्यांना 50 ते 75 टक्के अनुदान दिले जाते त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.
सर्वसाधारण प्रवर्गासाठी
- एकूण प्रकल्प किंमत : 12 लाख रुपये
- अनुदान : 50%
- अनुदान रक्कम : 6 लाख रुपये
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी
- एकूण प्रकल्पाची किंमत : 12 लाख रुपये
- अनुदान : 75 टक्के
- अनुदानाची रक्कम :9 लाख रुपये
या योजनेचे फायदे
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नवीन मत्स्यसंवर्धन तलाव बांधकाम निविष्ठा अनुदान योजनेचे फायदे खालील प्रमाणे आहेत.
- नवीन मत्स्यपालन तलाव बांधकाम करण्यासाठी अनुदान मिळते
- तलाव बांधकाम आणि निविष्ठांसाठी आर्थिक मदत दिली जाते
- एसटी आणि एससी प्रवर्गातील लाभार्थी शेतकरी बांधवांना ७५ टक्के पर्यंत अनुदान दिले जाते
- शेतकरी बांधवांना शेती सोबत जोडधंदा सुरू करता येतो
- ग्रामीण भागातील तरुण शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराची संधी मिळते
Machi Palan Anudan Yojana 2026 कागदपत्रे
मच्छी पालन तलाव बांधकाम अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांकडे योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावे लागतील त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.
- आधार कार्ड
- महा आयडी कार्ड
- जात प्रमाणपत्र
- शेत जमिनीचा सातबारा व उतारा
- शेती किंवा जागा भाडेतत्त्वावर असल्यास करारनामा
- प्रकल्प अहवाल
- बांधकामाचे अंदाजपत्रक
- तलाव बांधकामाचा आराखडा
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- राशन कार्ड
- मच्छी व्यवसाय करीत असलेले नोंदणी प्रमाणपत्र
याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने बँक पासबुक व अधिवास प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे लागू शकतात.
Machi Palan Anudan Yojana 2026 Online Apply
मच्छी पालन तलाव बांधकाम अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदार शेतकरी बांधवांनी आपल्या जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय विभागाची संपर्क करावा त्यांच्याकडून सर्वप्रथम अंदाजपत्रक आणि आराखडा तयार करून घ्यावा तसेच लागणारे आवश्यक कागदपत्रे व प्रकल्प अहवाल तयार करण्याची मार्गदर्शन घ्यावे सर्व कागदपत्रे तयार झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करावे लागेल.
यासाठी शेतकरी बांधवांना महाडीबीटी 2.0 पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करावे लागेल त्याची माहिती स्टेप बाय स्टेप खालील प्रमाणे आहे.
- सर्वात पहिले अर्ज करण्यासाठी महाडीबीटी 2.0 या पोर्टलवर ( https://mahadbt2.maharashtra.gov.in ) भेट द्यावी लागेल
- आता तुमच्यासमोर महाडीबीटी 2.0 पोर्टलचा होम पेज ओपन होईल
- त्यामध्ये तुम्हाला लॉगिन या पर्यायावर क्लिक करायचा आहे

- आता तुमच्यासमोर लॉगिन पेज ओपन होणार त्यामध्ये तुम्हाला महा आयडी उपयोग करून किंवा आधार नंबर टाकून लॉगिन करून घ्यायचा आहे.

- लॉगिन झाल्यानंतर तुमच्यासमोर अर्ज करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनेची यादी दिसेल
- All Scheme Type मध्ये तुम्हाला Fisheries Scheme पर्यावर क्लिक निवडायचे आहे
- त्यामध्ये तुम्हाला नवीन मस्त्यसंवर्धन तलाव बांधकाम व निविष्ठा अनुदान पर्याय दिसेल त्याच्यासमोर अर्ज करा या पर्यावर क्लिक करायचा आहे

- अर्ज करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाइल अपडेट करावी लागेल
- त्यामध्ये तुम्हाला जात प्रवर्गाची माहिती द्यावी लागेल तसेच तुम्हाला जात प्रमाण तर अपलोड करावी लागेल
- त्याचप्रमाणे आवश्यक सर्व माहिती द्यावी लागेल आणि NFDP नोंदणी क्रमांक टाकावा लागेल
- सर्व माहिती अचूक पद्धतीने भरल्या नंतर तुम्हाला अर्जदारची तपशील जतन करा या पर्यावर क्लिक करायचा आहे
- प्रोफाइल ची माहिती यशस्वीरित्या जतन झाल्यानंतर योजनेचा अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचा आहे
- आता तुमच्यासमोर मत्स्य व्यवसाय विभागाच्या विविध योजनांची यादी दिसेल
- त्यामध्ये तुम्हाला नवीन मस्त्यसंवर्धन तलाव बांधकाम व निविष्ठा अनुदान या योजनेची निवड करून अर्ज करा या पर्यावर क्लिक करायचा आहे.

- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज फॉर्म ओपन होईल
- त्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रकल्पाची किंमत तसेच अंदाजपत्र, आराखडा व इतर माहिती देऊन
- सबमिट या पर्यावर क्लिक करायचा आहे
अशाप्रकारे तुम्ही मच्छी पालन तलाव बांधकाम अनुदान योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता अर्ज करताना अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती व्यवस्थितपणे वाचावी.
तसेच सर्व कागदपत्रे व्यवस्थित पीडीएफ स्वरूपात करून अपलोड करावी जर अर्ज करतानी काही अडचणी आल्यास आपल्या जवळच्या सीएससी केंद्रामध्ये भेट देऊन किंवा जिल्हास्तरीय मत्स्य व्यवसाय विभाग त्यांच्या मार्फत अर्ज सादर करावा.
Machi Palan Anudan Yojana 2026 Official Links
| Maha ID Card Online Apply 2026 Link | Click Here |
| Machi Palan Anudan Yojana 2026 | Click Here |
FAQ- Machi Palan Anudan Yojana 2026
योजना कोणत्या विभागामार्फत राबवली जाते ?
ही योजना महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागामार्फत राबवली जात आहे
योजनेअंतर्गत किती अनुदान मिळतील
या योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकरी बांधवांना 50% तर अनुसूचित जाती आणि जमाती प्रभागातील शेतकरी बांधवांना 75% अनुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे
SC प्रवर्गातील लाभार्थ्याला किती अनुदान मिळते
9 लाखापर्यंत म्हणजे 75 टक्के अनुदान दिले जाते
ST प्रवर्गातील लाभार्थ्यांना किती अनुदान दिले जाते
75 टक्के अनुदान म्हणजे 9 लाख रुपये पर्यंत
1 हेक्टर तलाव बांधकामासाठी किती खर्च निश्चित करण्यात आलेला आहे
सरकारकडून एका हेक्टर साठी 12 लाख रुपये प्रकल्प किंमत निश्चित करण्यात आली आहे त्यामध्ये 8 लाखा रुपये तलाव बांधकाम करण्यासाठी आणि 4 लाख रुपये निविष्ठासाठी
Disclaimer : ही माहिती जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आली असून या योजनेच्या अटी पात्रता अर्जाची अंतिम तारीख निधी उपलब्धता आणि मंजूर प्रक्रिया संबंधित मत्स्य व व्यवसाय विभागाचा अधिकृत शासन निर्णय गृहीत धरावा

2 thoughts on “Machi Palan Anudan Yojana 2026 : मच्छी पालन व्यवसायासाठी 9 लाख रुपये अनुदान! ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू, लगेच पहा संपूर्ण माहिती व अर्ज प्रक्रिया”