Ladki Bahin Yojana EKYC 2026 : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना पंधराशे रुपये महिना दिला जात आहे हे पैसे थेट महिलांच्या आधारलिंक बँक खात्यात जमा होत आहेत परंतु या योजनेचा लाभ कायम घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून या योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे लाभार्थी महिलांनाअनिवार्य करण्यात आले होते.
त्यामध्ये लाखो महिलांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आणि त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत आहे परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांना योग्य माहिती नसल्यामुळे व तांत्रिक कारणामुळे त्या ई-केवायसी करू शकल्या नाही त्यामुळे त्यांना महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणे बंद झाले त्या महिला वाट पाहत होत्या की योजनेची ई-केवायसी प्रक्रिया कधी सुरू होणार
अशातच अशा सर्व महिलांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून 16 नोव्हेंबर 2026 पासून लाडकी बहीण योजनेची पुन्हा एकदा ई केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे तर आज आपण नवीन पद्धतीने प्रक्रिया ई-केवायसी ( Ladki Bahin Yojana eKYC 2026) कशा प्रकारे करायची त्यासाठी लागणारे कागदपत्रे व संपूर्ण प्रक्रिया आपण पुढे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत.
Table of Contents
About Ladki Bahin Yojana eKYC 2026
| योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना |
| योजनेची सुरुवात | 28 जून 2024 |
| राज्य | महाराष्ट्र |
| सरकार | महायुती सरकार |
| लाभार्थी | गरीब कुटुंबातील महिला |
| आर्थिक मदत | १ ५ ० ० रुपये महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन ( सध्या अर्ज प्रक्रिया बंद आहे ) |
| योजनेचे अधिकृत वेबसाईट | https://ladakibahin.maharashtra.gov.in |
| हेल्पलाइन नंबर | 181 |
लाडकी बहीण योजनेची eKYC प्रक्रिया सुरू
महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील कोटीविधी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले होते त्यासाठी सरकारने सुरुवातीला 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख दिली होती त्यानंतर सरकारने एक परिपत्रक काढून या योजनेच्या ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 एप्रिल 2026 पर्यंतमुदत वाढ दिली होती.
मात्र मुदतवाड देऊन ही अनेक पात्र महिलांनी या योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यामुळे अशा महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल बंद झाले होते आणि त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत होता अशातच सरकारने आता या योजनेची पुन्हा एकदा ई-केवायसी प्रक्रिया सुरू केलेली आहे.
मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्याला केली होती मागणी
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 22 ऑक्टोबर 2026 रोजी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करा त्याचप्रमाणे वेबसाईट मधीलतांत्रिक अडचणी दूर करून सुलभ व्यवस्था करावी अशा अनेक मागण्यासह निवेदन दिले होते.
या बाबीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक दखल घेतली होती आणि त्यांनी सहकार विभागाच्या प्रधान सचिवांना ह्या विषयावर आवश्यक ती कारवाई करण्यासाठी निर्देश दिले होते.

हे पण वाचा : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी पुन्हा सुरू होणार? सुधीर मुनगंटीवार यांची मोठी मागणी
Ladki Bahin Yojana eKYC करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पतीचे आधार कार्ड
- आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल
Ladki Bahin Yojana eKYC 2026 Online प्रक्रिया
महाराष्ट्र सरकारकडून 16 नोव्हेंबर 2026 पासून प्रक्रिया लाडकी बहीण योजनेची केवा ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू केली आहे त्यासाठी महिलांना आपली ई-केवायसी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करावी लागेल.
- सर्वात पहिले लाडक्या बहिणींना या योजनेच्या अधिकृत ( https://ladakibahin.maharashtra.gov.in ) वेबसाईटला भेट द्यायचे आहे
- आता तुमच्यासमोर ई-केवायसी पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा
- तुमच्या समोर ई-केवायसी करण्याचा पेज ओपन होईल

- त्यामध्ये तुम्हाला महिलेचा आधार नंबर टाकायचा आहे
- व कॅप्चर टाकून ओटीपी पाठवा या पर्यावर क्लिक करायचा आहे
- आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर ओटीपी येणार ओटीपी टाकून व्हेरिफाय करून घ्या
- आता तुम्हाला पतीचे आधार कार्ड टाकायचा पर्याय दिसेल
- पतीचे आधार नंबर टाकून ओटीपी पाठवा या पर्यायावर क्लिक करावा
- ओटीपी व्हेरिफाय करून सबमिट या पर्यावर क्लिक करावा
- अशा प्रकारे मुख्यमंत्री माजी लाडकी पण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता.
Ladki Bahin Yojana eKYC 2026 लिंक
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी जर तुम्ही डायरेक्ट ह्या योजनेच्या वेबसाईटवर केला तर काही तांत्रिक अडचणीमुळे ई-केवायसी करण्याचा हा पर्याय दिसणार नाही त्यामुळे खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता त्याची लिंक खाली दिली आहे .
| Ladki Bahin Yojana eKYC 2026 Link | Click Here |
सूचना : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याचा पर्याय व लिंक योजनेच्या अधिकृत पोर्टल वर दिसत आहे परंतु शासनाकडून अधिकृत ई – केवायसी सुरु झालेली माहिती प्रकाशित करण्यात आली नाही सदर माहिती आपल्याला देण्यात येत आहे याची नोंद घ्यावी व ई-केवायसी करताना काळजीपूर्वक करावे.

2 thoughts on “Ladki Bahin Yojana eKYC 2026 : लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी, लाडकी बहीण योजनेची eKYC प्रक्रिया पुन्हा सुरू, तात्काळ करा अशाप्रकारे ई-केवायसी”