Jiwati Farmer Karjmafi Kyc Update 2026 : जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा Farmer ID शिवाय करता येणार कर्जमाफीची KYC, पहा संपूर्ण बातमी

Jiwati Farmer Karjmafi Kyc Update 2026 : चंद्रपूर जिल्हातील जिवती तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ घेताना फॉर्मर आयडी नसल्यामुळे जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण ( KYC ) करण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत होता मात्र आता या अडचणीवर दिलासादायक मार्ग निघाल्याची मोठी बातमी समोर येत आहे तर आज आपण या ( Jiwati Farmer Karjmafi Kyc Update 2026 ) बातमी संदर्भात संपूर्ण माहिती पुढे पाहणार आहोत.

Farmer ID नसल्यामुळे शेतकरी होते अडचणीत

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवाकडे फॉर्म आयडी असणे महाराष्ट्र सरकारकडून अनिवार्य करण्यात आले होते परंतु जिवती तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या योजनेच्या यादीत नाव आल्यानंतर पण Farmer ID नसल्यामुळे कर्जमाफीची आधार प्रामाणीकरण प्रक्रिया पूर्ण करू शकत नव्हते त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत होता.

आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या पाठपुराव्याला यश

जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन लोकप्रिय आमदार माननीय श्री देवरावदादा भोंगळे यांनी या विषयावर पुढाकार घेतला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि पाठपुराव्यामुळे दिनांक 19 नोव्हेंबर 2026 पासून जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना फार्मर आयडी शिवाय आता कर्जमाफीची केवायसी करता येणार आहे त्यामुळे कर्जमाफीचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे या निर्णयामुळे Farmer ID नसल्यामुळे अडचणीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कर्जमाफीची KYC करण्यासाठी लागणारे कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • विशिष्ट क्रमांक
  • बँक पासबुक
  • कर्ज खाते असलेले बँक पासबुक
  • मोबाईल नंबर

अशाप्रकारे करा कर्जमाफीची KYC

जिवती तालुक्यातील ज्या शेतकरी बांधवांचे नाव कर्जमाफीची यादी मध्ये आलेली आहे त्या शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन आपली कर्जमाफीची केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे

Jiwati Farmer Karjmafi Kyc Update 2026
Jiwati Farmer Karjmafi Kyc Update 2026

हे पण वाचा : मच्छी पालन व्यवसायासाठी 9 लाख रुपये अनुदान! ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू, लगेच पहा संपूर्ण माहिती व अर्ज प्रक्रिया

कर्जमाफीच्या यादी मध्ये नाव कशाप्रकारे तपासावे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या यादीमध्ये आपले नाव तपासण्यासाठी आपण जवळच्या सेतू केंद्रामध्ये भेट देऊन तुमचे नाव यादीमध्ये तपासू शकता त्याचप्रमाणे ज्या बँकेमध्ये आपण पीक कर्ज घेतले होते त्या बँकेमध्ये जाऊन पण आपण आपले नाव यादीमध्ये पाहू शकता.

1 thought on “Jiwati Farmer Karjmafi Kyc Update 2026 : जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा Farmer ID शिवाय करता येणार कर्जमाफीची KYC, पहा संपूर्ण बातमी”

Leave a Comment