Pashusavardhan Yojana 2026 Online Apply : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना Online अर्ज प्रक्रिया सुरु, लगेच पहा संपूर्ण अर्ज प्रक्रिया

Pashusavardhan Yojana 2026 Online Apply : महाराष्ट्र राज्यातील युवक महिला व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे ज्या युवक, महिला व शेतकरी बांधवांना आपला स्वतःचा शेळीपालन, कुक्कुटपालन अशा प्रकारचे व्यवसाय करायचे आहे अशा लाभार्थ्यांना सुवर्णसंधी सरकारने दिलेली आहे महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना अंतर्गत विविध प्रकारच्या योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया महाडीबीटी 2.0 अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे.

या योजनेअंतर्गत 75 टक्के पर्यंत अनुदान सरकारकडून दिले जाणार आहे जर तुम्हाला पण शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर त्यासाठी अर्ज कसा करायचा त्यांना लागणारे आवश्यक कागदपत्रे व संपूर्ण अर्ज प्रक्रिया आपण स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे, याचा तुम्ही वापर करून योग्य पद्धतीने घरबसल्या या Pashusavardhan Yojana 2026 Online Apply योजनेसाठी अर्ज सादर करू शकता.

Pashusavardhan Yojana 2026 Online Apply -Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री ग्रामीण पशुधनी उद्योजकता योजना 2026
राज्यमहाराष्ट्र
विभागपशुसंवर्धन विभाग
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील नागरिक
वय मर्यादाकिमान 18 वर्षे पूर्ण असावे
अनुदान50 ते 75 टक्के पर्यंत
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
योजनेसाठी अर्ज करण्याची लिंकClick Here
योजनेच्या अधिकृत वेबसाईटhttps://mahadbt2.maharashtra.gov.in/
हेल्पलाइन नंबर०२२-४९१५०८००

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.

  • आधार कार्ड
  • आधार लिंक असलेला मोबाईल नंबर
  • फॉर्मर आयडी
  • जात प्रमाणपत्र
  • महा आयडी
  • राशन कार्ड

योजनेअंतर्गत किती अनुदान मिळते

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने अंतर्गत राज्यातील नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाणार आहे त्याची माहिती प्रवर्गानुसार खालील प्रमाणे आहे.

  • सर्वसाधारण प्रवर्गासाठी : महाराष्ट्र सरकारकडून सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50% पर्यंत अनुदान दिले जाणार आहे
  • अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी : महाराष्ट्र सरकारकडून अनुचित जाती व जमाती प्रवर्गासाठी 75 टक्के पर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

योजनेअंतर्गत कोणकोणत्या व्यवसायासाठी अनुदान मिळते

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने अंतर्गत विविध प्रकारच्या व्यवसायासाठी महाराष्ट्र सरकारकडून अनुदान दिले जात आहे त्याची माहिती खालील प्रमाणे.

  • दूध व्यवसाय करण्यासाठी दुधाळ गाय व म्हैस खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते.
  • शेळी व मेंढी पालन व्यवसाय करण्यासाठी अनुदान दिले जाते
  • कुकूटपालन व्यवसाय करण्यासाठी अनुदान दिले जाते
  • बैल जोडी खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते
  • अंडी देणाऱ्या कोंबड्यांचे संगोपन साठी अनुदान दिले जाते

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना अंतर्गत इतर व्यवसाय करण्यासाठी पण अनुदान दिले जाते त्याच्या संपूर्ण माहितीसाठी महाडीबी पोर्टलवर भेट देऊन तपासणी करून घ्यावे.

हे पण वाचा :  : मच्छी पालन व्यवसायासाठी 9 लाख रुपये अनुदान! ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू, लगेच पहा संपूर्ण माहिती व अर्ज प्रक्रिया

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता

  • अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा
  • अर्जदारांचे किमान वय 18 वर्षे पूर्ण असावे
  • योजनेचे लाभ कुटुंबातील फक्त एक व्यक्ती घेऊ शकणार
  • अर्जदाराकडे जनावरे व व्यवसाय करण्यासाठी जागा किंवा गोटा असणे आवश्यक आहे

Pashusavardhan Yojana 2026 Online Apply

महाराष्ट्र सरकारकडून 26 नोव्हेंबर 2026 पासून मुख्यमंत्री ग्रामीण उद्योजकता योजनेचे विविध प्रकारचे अर्ज महाडीबीटी 2.0 पोर्टल अंतर्गत सुरू करण्यात आलेले आहे या योजनेची मागील अनेक महिन्यापासून राज्यातील नागरिक प्रतीक्षा करत होते आणि आता या योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेली आहे त्याची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

  • सर्वात पहिले योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी 2.0 पोर्टल ( https://mahadbt2.maharashtra.gov.in/ ) वर भेट द्यावी लागेल
  • महाडीबीटी 2.0 पोर्टलवर केल्यानंतर नागरिक लॉगिन या पर्यावर क्लिक करायचा आहे
  • जर तुम्ही अद्याप महाआयडी तयार केलेली नाही तर तुम्ही नवीन नोंदणी या पर्यावर क्लिक करून आपले महाआयडी प्रथम तयार करून घ्या
  • आणि त्यानंतर लॉगिन या पर्यावर क्लिक करा
Pashusavardhan Yojana 2026 Online Apply
Pashusavardhan Yojana 2026 Online Apply
  • आता तुम्हाला महाआयडी किंवा आधार नंबर टाकून लॉगिन करून घ्यायचा आहे
  • आता तुमच्यासमोर विविध विभागाच्या योजना दिसतील
  • त्यामध्ये तुम्हाला पशुसंवर्धन विभाग निवडायचा आहे
  • आता तुम्हाला तुमची प्रोफाइल अपडेट करून घ्यायचे आहे
  • त्यामध्ये तुम्हाला तुमचा प्रवर्ग व मोबाईल नंबर व्हेरिफाय करून घ्यायचा आहे
  • तसेच तुम्हाला तुमचे राशन कार्ड नंबर टाकायचा आहे
  • आता तुमच्यासमोर पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना तुमच्या पात्रतेनुसार दिसतील
Pashusavardhan Yojana 2026 Online Apply
Pashusavardhan Yojana 2026 Online Apply
  • त्यामध्ये तुम्हाला ज्या योजनेसाठी अर्ज करायचे आहे त्याच्यापुढे अर्ज करा या पर्यावर क्लिक करायचा आहे
  • आता तुमच्या समोर त्या योजनेचा अर्ज ओपन होईल
Pashusavardhan Yojana 2026 Online Apply
Pashusavardhan Yojana 2026 Online Apply
  • त्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रकल्पाची माहिती व किंमत दिसेल आणि तुम्हाला मिळणाऱ्या अनुदान दिसेल
  • योग्य प्रकारे माहिती वाचून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला अर्ज सादर करून घ्यायचा आहे
Pashusavardhan Yojana 2026 Online Apply
Pashusavardhan Yojana 2026 Online Apply

अशाप्रकारे तुम्ही मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने अंतर्गत अर्ज सादर करू शकता जर तुम्हाला स्वतः अर्ज करता येत नसेल तर तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रामध्ये भेट देऊन अर्ज सादर करून घ्या, तसेच अर्ज सादर करताना योजनेची संपूर्ण माहिती व नियम वाचून घ्या त्यानंतरच अर्ज सादर करा.

FAQ- Pashusavardhan Yojana 2026 Online Apply

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेची अर्ज करण्याची वेबसाईट

या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय ?

महाराष्ट्र सरकारकडून प्रथम अर्ज प्रथम संधी यानुसार अर्ज स्वीकारले जात आहे परंतु अद्याप सरकारकडून शेवटची तारीख जाहीर करण्यात आली नाही

अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर करायचे आहे का ?

नाही

स्वतःची जमीन नसल्यास या योजनेचा लाभ घेता येतो का ?

हो, जमीन भाडेतत्त्वावर घेऊन सुद्धा या योजनेचा लाभ घेता येतो

या योजनेअंतर्गत अनुदान किती दिले जाते ?

महाराष्ट्र सरकारकडून या योजनेअंतर्गत 50 ते 75 टक्के पर्यंत अनुदान दिले जाणार आहे

1 thought on “Pashusavardhan Yojana 2026 Online Apply : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना Online अर्ज प्रक्रिया सुरु, लगेच पहा संपूर्ण अर्ज प्रक्रिया”

Leave a Comment